
पुण्यातील एका प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकाचा मुलगा, केतन अग्रवाल, याचा लोहगडावर ३५० फूट खोल दरीत कोसळून दुर्दैवी मृत्यू झाला. अवघ्या २४ वर्षांच्या या तरुणाच्या मृत्यूने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे, अवघ्या काही महिन्यांतच केतनचा विवाह संपन्न होणार होता, परंतु नियतीच्या मनात काही वेगळेच होते.
लग्नाची जय्यत तयारी अन् अचानक कोसळलेला दुःखाचा डोंगर केतन अग्रवाल हा पुण्याचा रहिवासी असून त्याचे वडील विशाल अग्रवाल हे नामांकित बांधकाम व्यावसायिक आहेत. केतन परदेशातून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करून नुकताच भारतात परतला होता आणि आपल्या कौटुंबिक रिअल इस्टेट व्यवसायात संचालक म्हणून काम पाहत होता. येत्या नोव्हेंबर महिन्यात त्याचे लग्न होणार होते. या लग्नासाठी उदयपूरमधील एक आलिशान पॅलेस बुक करण्यात आला असून पाहुण्यांच्या सुविधेसाठी दोन विशेष विमानेही बुक केली होती. या शाही लग्नासाठी तब्बल १७ कोटी रुपयांचा खर्च नियोजित होता .
वाढदिवसाचे सेलिब्रेशन बेतले जीवावर केतनच्या होणाऱ्या पत्नीचा १९ जून रोजी वाढदिवस होता. हा खास दिवस साजरा करण्यासाठी दोघेही १८ जूनला सकाळी लोहगडावर फिरायला गेले होते. गडावरील ‘हत्ती तलावा’जवळून जाणाऱ्या एका वाटेवर ते फोटो काढत होते. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, केतन आपली भावी पत्नी फोटो काढत असताना पोझ देत होता. तिने फोटो काढून मागे वळून पाहिले तोवर केतनचा तोल गेला होता आणि तो दरीत कोसळला.
रेस्क्यू ऑपरेशन आणि सोशल मीडियावरील अफवा घटनेची माहिती मिळताच लोणावळ्यातील ‘शिवदुर्ग मित्र’ आणि ‘वन्यजीव रक्षक मावळ’ या रेस्क्यू टीमने तातडीने धाव घेतली. सुमारे ३५० फूट खोल दरीतून केतनला बाहेर काढून रुग्णालयात नेण्यात आले, परंतु उपचारापूर्वीच त्याला मृत घोषित करण्यात आले.

या घटनेनंतर सोशल मीडियावर केतनचा संबंध पुण्याच्या चर्चित पोर्श प्रकरणातील विशाल अग्रवालशी जोडला जात होता. मात्र, केतन हा त्या प्रकरणातील विशाल अग्रवालचा नातेवाईक नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
ट्रेकर्ससाठी धोक्याचा इशारा लोहगडावरील ज्या ठिकाणी ही दुर्घटना घडली, तिथे कोणताही संरक्षक कठडा नाही. वाऱ्याचा वेग आणि निसरडी वाट यामुळे हा भाग अत्यंत धोकादायक मानला जातो. पर्यटकांनी आणि ट्रेकर्सनी अशा धोकादायक ठिकाणी सेल्फी किंवा फोटो काढण्याचा मोह टाळावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. एका आनंदी कुटुंबातील लग्नाची तयारी आता अंत्यविधीच्या दुःखात बदलली असून, केतनच्या जाण्याने अग्रवाल कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
पहिली पत्नी, दुसरी पत्नी आणि गर्लफ्रेंडसोबत एकाच कारमध्ये दिसला आमिर खान! सोशल मीडियावर चर्चांना उधाण


Mahesh Rathod is a News Writer at Maharashtra Trending with over five years of experience covering Maharashtra politics, breaking news, social issues, crime, and current affairs. He is committed to delivering accurate, timely, and reliable news that keeps readers informed about the latest developments across the state.








