भारत घेणार २३,६३२ कोटींचे कर्ज

भारत घेणार २३,६३२ कोटींचे कर्ज: आर्थिक संकट की विकासाची नवी झेप? जाणून घ्या सविस्तर!

भारताने जागतिक बँक (World Bank) आणि आशियाई विकास बँक (ADB) कडून तब्बल २.५ अब्ज डॉलर्स म्हणजेच सुमारे २३,६३२ कोटी रुपयांचे कर्ज घेण्याचा निर्णय घेतला आहे. जेव्हा एखादा देश एवढ्या मोठ्या प्रमाणात कर्ज घेतो, तेव्हा सर्वसामान्यांच्या मनात प्रश्न येतो की देशावर काही आर्थिक संकट तर आले नाही ना? भारताची अवस्थाही शेजारील पाकिस्तानसारखी झाली आहे का? पण वस्तुस्थिती याच्या अगदी उलट आहे.

कर्ज घेण्याचे मुख्य कारण काय? या कर्जाचे सर्वात मोठे कारण म्हणजे केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांना खतांवर (Fertilizers) दिली जाणारी सबसिडी किंवा अनुदान. भारत आपल्या गरजेची बहुतांश खते रशिया, सौदी अरेबिया, चीन आणि ओमानसारख्या देशांतून आयात करतो. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत खतांच्या किमती आणि ते बनवण्यासाठी लागणाऱ्या नॅचरल गॅसच्या किमती वाढल्या असल्या तरी, सरकार शेतकऱ्यांना ठराविक किमतीतच खत उपलब्ध करून देते.

आखाती देशांमधील युद्धामुळे खतांच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. अर्थसंकल्पात खतांच्या अनुदानासाठी १.७५ लाख कोटी रुपयांचा अंदाज वर्तवला होता, पण आता हा खर्च थेट ३.४ लाख कोटी रुपयांवर जाण्याची शक्यता आहे. हा दुप्पट भार उचवण्यासाठी सरकारला या जास्तीच्या निधीची आवश्यकता आहे.

सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी घेतलेला निर्णय केवळ खतेच नाही, तर ‘गरीब कल्याण अन्न योजना’ सारख्या लोकोपयोगी योजना आणि पेट्रोल-डिझेलच्या किमती नियंत्रणात ठेवण्यासाठी सरकारने एक्साईज ड्युटीमध्ये केलेली कपात, यामुळे सरकारी महसुलात घट झाली आहे. हा महसूल भरून काढण्यासाठी लोकांवर करांचा (Tax) बोजा वाढवण्यापेक्षा जागतिक बँकेकडून कर्ज घेणे सरकारने पसंत केले. या बँकांचे व्याजदर कमी असतात आणि परतफेडीचा कालावधीही मोठा असतो.

इटलीत पोहोचली डेहराडूनची गोड लीची! भारताने पाठवली पहिली खेप

भारत आर्थिक संकटात नाही! महत्त्वाची गोष्ट म्हणजे, हे कर्ज म्हणजे पाकिस्तानला मिळणारे ‘बेल आउट’ पॅकेज नाही. आयएमएफ (IMF) कडून कर्ज तेव्हा घेतले जाते जेव्हा अर्थव्यवस्था बुडण्याची भीती असते. भारताची अर्थव्यवस्था भक्कम आहे; हे कर्ज केवळ अर्थव्यवस्थेत गुंतवणूक करण्यासाठी आणि विकासकामांना गती देण्यासाठी घेतले जात आहे. जागतिक बँकेने भारतासाठी ‘न्यू पार्टनरशिप फ्रेमवर्क’ अंतर्गत दरवर्षी ८ ते १० अब्ज डॉलर्सचे कर्ज देण्याची तयारी आधीच दर्शवली आहे.

थोडक्यात सांगायचे तर, हे कर्ज म्हणजे भारताच्या आर्थिक नियोजनाचा एक भाग असून यामुळे पायाभूत सुविधा आणि विकासाला मोठी चालना मिळणार आहे.

India Loan from World Bank: भारत World Bank कडून 23,632 कोटींचं कर्ज का घेतोय ? आर्थिक संकट वाढलं ?

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top