धाराशिवमध्ये निंबाळकर बंधूंमध्ये राजकीय ठिणगी!

धाराशिवमध्ये निंबाळकर बंधूंमध्ये राजकीय ठिणगी! ओमराजेंच्या निर्णयावर नंदुराजे नाराज, ठाकरेंची साथ सोडणार नाही

धाराशिवच्या राजकारणात सध्या एकच चर्चा रंगली आहे, ती म्हणजे निंबाळकर बंधूंमधील राजकीय फुटीची. ठाकरे गटाचे निष्ठावंत मानले जाणारे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आणि यामुळे जिल्ह्याच्या राजकारणात मोठा भूकंप झाला आहे. मात्र, या निर्णयामुळे त्यांचे सख्खे बंधू आणि धाराशिव शहराचे माजी नगराध्यक्ष नंदुराजे निंबाळकर यांनी उघडपणे आपली नाराजी व्यक्त केली असून भावाची साथ सोडण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत.

शिंदेंची पॉवर वाढली ओमराजांना सरळ मंत्रीपद?

“भावाचा निर्णय मनाला पटला नाही” गेल्या अनेक वर्षांपासून ओमराजे आणि नंदुराजे हे समीकरण धाराशिवकरांनी एकत्र पाहिलं आहे. मात्र, आता हे समीकरण कायमचं बदलणार असं दिसतंय. नंदुराजे निंबाळकर यांनी स्पष्ट केलं आहे की, ओमराजेंनी हा निर्णय का घेतला हे त्यांना उमगलेलं नाही आणि हा निर्णय त्यांच्या मनाला अजिबात पटलेला नाही. “मी सन्माननीय उद्धव साहेब ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये यापूर्वीच सहसंपर्क प्रमुख म्हणून कार्यरत आहे आणि मी त्यांच्याबरोबरच काम करणार,” असं म्हणत त्यांनी आपली निष्ठा अधोरेखित केली आहे.

ठाकरेंचा बालेकिल्ला राखण्याचं आव्हान ओमराजे निंबाळकर यांनी पक्ष सोडणं हा धक्का आहे का? या प्रश्नावर नंदुराजेंनी प्रांजळपणे उत्तर दिलं की, “निश्चितपणे हा धक्का आहे, कारण त्यांचा जनसंपर्क मोठा आहे”. मात्र, त्यांनी हे देखील ठामपणे सांगितलं की, धाराशिव जिल्हा हा शिवसेना आणि ठाकरे कुटुंबाला मानणारा बालेकिल्ला आहे. आगामी काळात संघटना पुन्हा एकदा व्यवस्थितरीत्या बांधून शिवसेनेचा हा गड कसा कायम राहील, याकडेच आपलं लक्ष असेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

बीडमध्ये विलास घुले हत्या प्रकरणावरून राजकीय रणकंदन

भावाविरुद्ध संघर्षाची तयारी? सर्वात कळीचा प्रश्न म्हणजे, जर उद्या निवडणुकीत ओमराजे विरुद्ध नंदुराजे असा सामना रंगला तर? यावर बोलताना नंदुराजे अत्यंत संयमी पण ठाम दिसले. ते म्हणाले की, “उमेदवार मिळत नाही असं नसतं, पक्षाने या जिल्ह्यात मोठं नाव कमावलं आहे आणि पक्षाला चांगले उमेदवार नक्कीच मिळतील”. भावाविरुद्धच्या संघर्षाबाबत विचारलं असता, “मी एवढा मोठा माणूस नाही, पण आमचे पक्षप्रमुख जो निर्णय घेतील, त्या पद्धतीनेच माझी पुढील वाटचाल राहील,” असं सांगत त्यांनी पक्ष आदेशाला महत्त्व दिलं आहे.

शिंदे-ठाकरे आमनेसामने: फेकनाथ मिंदे टीकेला प्रत्युत्तर

थोडक्यात सांगायचं तर, धाराशिवच्या या ‘निंबाळकर’ घराण्यातील राजकीय संघर्षाने आता नवी वळणं घ्यायला सुरुवात केली आहे. भावाच्या विरोधात भूमिका घेण्याची वेळ आली तरी नंदुराजे मागे हटणार नाहीत, हे त्यांच्या बोलण्यातून स्पष्ट जाणवत आहे

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top