मान्सूनचा ‘ब्रेक’ आता संपणार! राज्यात पावसाचा जोर कधी वाढणार?

मान्सूनचा ‘ब्रेक’ आता संपणार! राज्यात पावसाचा जोर कधी वाढणार? वाचा हवामान विभागाचा नवा अंदाज

गेल्या १२ दिवसांपासून मान्सून एकाच जागेवर रेंगळल्यामुळे राज्यावर चिंतेचे ढग दाटले आहेत. रखडलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या खरीप पेरण्या खोळंबल्या असून उन्हाचा चटका आणि उकाडा असह्य होऊ लागला आहे. मात्र, आता बळीराजासाठी एक दिलासादायक बातमी समोर येत आहे.

राज्यात पावसाची ७८ टक्के तूट भारतीय हवामान शास्त्र विभागाने (IMD) जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, १८ जूनपर्यंत देशात सरासरीपेक्षा ३८% कमी पाऊस झाला आहे. महाराष्ट्राची स्थिती तर अधिक चिंताजनक असून राज्यात तब्बल ७८% पावसाची तूट नोंदवण्यात आली आहे. धुळे, नंदुरबार आणि ठाणे या जिल्ह्यांमध्ये तर पावसाने अद्याप खातेही उघडलेले नाही, तिथे १००% तूट पाहायला मिळतेय. राज्यातील २६ जिल्ह्यांमध्ये पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा ६० ते ९९ टक्क्यांनी कमी आहे.

कधी होणार मान्सून सक्रिय? हवामान विभागाच्या अंदाजानुसार, मान्सूनचा रखडलेला प्रवास पुढील आठवड्यात पुन्हा गती घेईल. २५ जून ते १ जुलै या दरम्यान मान्सून संपूर्ण महाराष्ट्र व्यापण्याची शक्यता आहे. २४ जूनपर्यंत पावसाचा जोर कमी असला तरी, त्यानंतर कोकण किनारपट्टीवर जोरदार सरी कोसळण्याचा अंदाज आहे. कोकण, गोवा आणि कर्नाटकच्या किनारी भागात सरासरीपेक्षा जास्त पाऊस होऊ शकतो, परंतु राज्याच्या उर्वरित भागात पाऊस सरासरीपेक्षा कमीच राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

एल निनो आणि आयओडीचा प्रभाव यंदा मान्सूनवर ‘एल निनो’ सक्रिय असल्याचा परिणाम स्पष्टपणे जाणवत आहे. मात्र, ‘मॅडन जुलियन ऑसिलेशन’ (MJO) सध्या पोषक स्थितीतून पुढे सरकत असल्याने पावसाला काहीसा वेग मिळण्याची चिन्हे आहेत. तसेच, हंगामाच्या उत्तरार्धात ‘इंडियन ओशन डायपोल’ (IOD) सकारात्मक झाल्यास एल निनोची तीव्रता कमी होऊ शकते, असा अंदाज हवामान अभ्यासकांनी वर्तवला आहे.

शेतकऱ्यांनी काय काळजी घ्यावी? जूनच्या सुरुवातीला निर्माण झालेली पावसाची मोठी तूट जून अखेरच्या पावसाने पूर्णपणे भरून निघण्याची शक्यता कमी आहे. पावसाच्या उशिरा आगमनामुळे जलाशयातील पाणीसाठाही वेगाने कमी होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरण्यांची घाई न करता, पावसाचा जोर आणि जमिनीतील ओलावा पाहूनच निर्णय घ्यावा, असे आवाहन करण्यात येत आहे.

हवामान विभागाचे हे केवळ अंदाज असून, स्थानिक परिस्थितीनुसार त्यात बदल होऊ शकतात, हे शेतकऱ्यांनी लक्षात घेणे गरजेचे आहे

कोल्हापूरची माधुरी अंबानी यांच्याकडे खुश होती तर कोल्हापुरात कशासाठी?

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top