नाही भेटला असा कोणी ज्यांनी मला छळलं नाही.- उद्धव ठाकरे

उद्धव ठाकरे “मित्र कोण आणि शत्रू कोण, गणित साधं कळलं नाही; नाही भेटला असा कोणी ज्यांनी मला छळलं नाही. रुसून राहिले माझ्या अगदी जवळचे, मी कुणाला कळलो नाही…”

हे शब्द आहेत उद्धव ठाकरे यांचे. गेल्या चार वर्षांत महाराष्ट्राच्या राजकारणात घडलेल्या घटनांवर हे शब्द तंतोतंत लागू पडतात.

एकेकाळी शिवसेनेचे प्रमुख असलेल्या उद्धव ठाकरे यांना स्वतःच्या पक्षातच मोठ्या बंडाचा सामना करावा लागला.

पक्षाचे तब्बल ४० आमदार एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली वेगळे झाले आणि त्यांनी शिवसेनेवर आपला दावा सांगितला.

यानंतर निवडणूक आयोगाने पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदे यांच्या गटाला दिले.

त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी ‘मशाल’ हे चिन्ह स्वीकारत उद्धव बाळासाहेब ठाकरे (उबाठा) गटाची स्थापना केली.

मात्र, नियतीचा खेळ इथेच थांबला नाही. आता उद्धव ठाकरे यांच्या गटातील सहा खासदारांनीही शिंदे गटात प्रवेश केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.

सध्या पक्षाचे नाव, चिन्ह आणि संघटनात्मक ताकद मोठ्या प्रमाणात शिंदे गटाकडे आहे.

दुसरीकडे उद्धव ठाकरे यांच्याकडे काही आमदार आणि हाताच्या बोटांवर मोजता येतील इतके खासदार उरले आहेत.

ठाकरेंच्या फुटीर खासदारांच्या घराबाहेर सुरक्षा वाढवली; पोलिसांचा कडक बंदोबस्त 

ठाकरेंचे खासदार फुटले! महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ; ‘ऑपरेशन टायगर’ने बदलणार समीकरणे?

राजकारणात काळानुसार समीकरणे बदलत असतात. मात्र, या सर्व घडामोडींमध्ये उद्धव ठाकरे यांनी आक्रमक किंवा गलिच्छ राजकारणाचा मार्ग स्वीकारला नाही,

अशी त्यांचे समर्थकांची भावना आहे. पक्ष सोडून जाणाऱ्यांना त्यांनी रोखण्याचा फारसा प्रयत्न केला नाही.

आता सर्वांच्या मनात एकच प्रश्न आहे—यापुढे काय? उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे जनतेत मिसळून पुन्हा एकदा संघर्षाच्या जोरावर शिवसेनेला उभारी देणार का?

की पक्षातील गळती अशीच सुरू राहणार? उबाठा गटातील आणखी नेते आणि कार्यकर्ते शिंदे यांच्या शिवसेनेत जाणार का?

ओमराजे निंबाळकरांशी संपर्क होत नाही; बंडाची चर्चा अफवा ठरावी, कैलास पाटील यांची प्रतिक्रिया

Eknath Shinde Credit- PTI

या सर्व प्रश्नांची उत्तरे येणारा काळच देईल. मात्र, ठाकरे पिता-पुत्र पुन्हा एकदा संघर्षाचा वारसा जपत राजकीय पुनरागमन करतात की नाही,

याकडे महाराष्ट्रासह संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top