मुंबई लोकलमध्ये २२ वर्षीय तरुणाची हत्या!

मुंबई लोकलमध्ये रक्ताचा सडा! दरवाजा लावण्याच्या किरकोळ वादातून २२ वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या; पाहा काय घडलं त्या काळरात्री?

मुंबई: मुंबईची जीवनवाहिनी मानली जाणारी लोकल आता सर्वसामान्यांसाठी मृत्यूचा सापळा बनत चालली आहे का? असा संतप्त सवाल आता विचारला जात आहे. मंगळवार, २३ जूनच्या रात्री पश्चिम रेल्वेवर एक असा थरार घडला ज्याने संपूर्ण मुंबई हादरली आहे. एका २२ वर्षांच्या तरुणाची केवळ लोकलचा दरवाजा लावण्याच्या किरकोळ वादातून चाकूने भोसकून हत्या करण्यात आली.

नेमकं काय घडलं त्या रात्री? २२ वर्षांचा मयंक लोहार, जो अंधेरीतील एका ‘वेस्ट साइड’ स्टोअरमध्ये सेल्स पर्सन म्हणून कामाला होता, नेहमीप्रमाणे आपले काम संपवून घरी जाण्यासाठी निघाला होता. रात्री १०:०५ च्या सुमारास चर्चगेटवरून सुटलेली नालासोपारा फास्ट लोकल १०:४२ वाजता अंधेरी स्टेशनवर आली आणि मयंक मिडल फर्स्ट क्लास डब्यात चढला. त्याचवेळी आरोपी सुद्धा त्याच डब्यात चढला होता.

विजय थलपती-तृषा यांनी एकांतात साजरा केला बर्थडे, गोल्डन कपल?

बाहेर पावसाचा जोर प्रचंड होता आणि धावत्या लोकलमध्ये पावसाचे पाणी आत येत असल्याने डब्यातील प्रवासी भिजत होते. मयंकने दरवाजा लावण्याचा प्रयत्न केला, पण दरवाजात उभ्या असलेल्या व्यक्तीशी त्याचा याच कारणावरून वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की, अंधेरी ते बोरिवली दरम्यान मयंक आणि त्या अज्ञात इसमामध्ये बाचाबाची झाली. रागाच्या भरात त्या नराधमाने आपल्या बॅगेतून चाकू काढला आणि भरधाव लोकलमध्ये मयंकच्या पोटात खुपसला. मयंक रक्ताच्या थारोळ्यात पडला आणि डब्यात एकच खळबळ उडाली.

आरोपीचा थरारक पळ आणि पोलिसांची कारवाई रात्री ११:०४ वाजता लोकल बोरिवली स्टेशनच्या प्लॅटफॉर्म नंबर ६ वर पोहोचली, तेव्हा आरोपीने धावत्या गाडीतून उडी मारून पळ काढला. सीसीटीव्हीमध्ये हा आरोपी काळा शर्ट आणि काळी पॅंट घातलेला स्पष्टपणे दिसत आहे. मयंकला तात्काळ बोरिवलीतील इमर्जन्सी मेडिकल रूममध्ये आणि नंतर कांदिवलीच्या शताब्दी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले, पण रात्री १२ च्या सुमारास त्याला मृत घोषित करण्यात आले.

शक्तिमान ने घेतले 25 लाख आणि गंडवलं ? शक्तिमान ने लाज सोडली

प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐराणीवर रेल्वे पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून आरोपीला पकडण्यासाठी एकूण ७ पथके तैनात केली आहेत. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीची ओळख पटली असली तरी त्याचे नाव अद्याप समोर आलेले नाही. धक्कादायक बाब म्हणजे, अवघ्या पाच महिन्यांपूर्वी २४ जानेवारीला मालाड स्थानकात अशाच एका शुलल्क वादातून ३२ वर्षीय प्राध्यापकाची हत्या झाली होती.

रेल्वे स्टेशनवर मेटल डिटेक्टर आणि सीसीटीव्ही असतानाही लोक अशा प्रकारे शस्त्रे घेऊन प्रवास कसा करतात? रेल्वे प्रशासनाकडे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी नक्की काय आराखडा आहे? हे प्रश्न आता उपस्थित केले जात आहेत.

शिवसेना फुटीचे ‘व्हिलन’ संजय राऊत?

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top