लोहगड हत्याकांड: १७ कोटींचं ‘शाही लग्न’ अन् रक्तरंजित शेवट; होणाऱ्या नवरीनेच रचला केतनच्या खुनाचा कट!

पुण्यातील एका प्रतिष्ठित कुटुंबातील ‘बिग फॅट वेडिंग’ची चर्चा अख्ख्या महाराष्ट्रात होती. १७ कोटींचा राजवाडा, पाहुण्यांसाठी दोन विशेष विमानं आणि एक भव्य स्वप्न… पण या स्वप्नाचा शेवट इतका भयानक असेल असं कोणालाच वाटलं नव्हतं. लोहगडाच्या ३५० फूट खोल दरीत केतन अग्रवालचा झालेला मृत्यू हा अपघात नसून चक्क त्याच्या होणाऱ्या पत्नीने, सिया गोयलने रचलेला एक थंड रक्ताचा खून होता.
गोकुळ गीते शिंदे गटात प्रवेश पहा

नेमकं प्रकरण काय? पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल यांचा २४ वर्षांचा मुलगा केतन, जो परदेशातून शिक्षण पूर्ण करून नुकताच व्यवसायात परतला होता, त्याचे लग्न नोव्हेंबर महिन्यात सिया गोयलशी होणार होते. या शाही विवाह सोहळ्यासाठी जयपूरमध्ये १७ कोटी रुपये खर्चून एक पॅलेस बुक करण्यात आला होता, तर पाहुण्यांच्या प्रवासासाठी दोन विशेष विमानेही सज्ज होती. मात्र, १८ जूनला सियाच्या वाढदिवसाच्या आदल्या दिवशी ही जोडी लोहगडावर फिरायला गेली. तिथे ‘हत्ती तलावा’जवळ फोटो काढताना केतनचा तोल गेला आणि तो ३५० फूट खोल दरीत कोसळला, असा बनाव सियाने रचला आणि सुरक्षा रक्षकांना माहिती दिली.
CCTV मुळे उघड झाले खुनाचे गूढ सुरुवातीला हा अपघाती मृत्यू वाटत असतानाच लोणावळा ग्रामीण पोलिसांनी तांत्रिक तपास सुरू केला. गडाच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक संशयास्पद मुलगा कडक उन्हातही ‘हुडी’ घालून आणि चेहरा झाकून या दोघांचा पाठलाग करताना दिसला. पोलिसांनी जेव्हा मोबाईल लोकेशन आणि कॉल रेकॉर्ड तपासले, तेव्हा तो मुलगा सियाचा जवळचा मित्र असल्याचे समोर आले. सियानेच त्याला या ट्रेकची माहिती दिली होती आणि हत्ती तलावाजवळ संधी मिळताच सियाने आपल्या मित्राच्या मदतीने केतनला कड्यावरून खाली ढकलून दिले.

का केला लग्नाच्या आधीच ‘नवरदेवाचा’ घात? सियाला हे लग्न मान्य नव्हते. केतन एका मोठ्या व्यावसायिक कुटुंबातील आणि स्वतः कंपनीचा डायरेक्टर असला तरी, सियाला तो नवरा म्हणून पसंत नव्हता. घरच्यांच्या दबावामुळे तिने लग्नाला होकार दिला होता, पण मनातून ती या नात्याचा द्वेष करत होती. याच नावडत्या लग्नातून सुटका मिळवण्यासाठी तिने हा भयंकर कट रचला.
मोठी बातमी! अखेर शेतकरी कर्जमाफी प्रक्रिया सुरू
ज्या नवरीबद्दल संपूर्ण शहर सहानुभूती व्यक्त करत होतं, तीच नवरी खुनी निघाली या सत्याने संपूर्ण पुणे हादरलं आहे. सध्या पोलिसांनी सिया गोयल आणि तिच्या मित्राला अटक केली असून त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

Mahesh Rathod is a News Writer at Maharashtra Trending with over five years of experience covering Maharashtra politics, breaking news, social issues, crime, and current affairs. He is committed to delivering accurate, timely, and reliable news that keeps readers informed about the latest developments across the state.








