शिवसेना फुटीचे ‘व्हिलन’ संजय राऊत?

शिवसेना फुटीचे ‘व्हिलन’ संजय राऊत? ‘आरोपी नंबर २’ ते मुख्य सूत्रधार; जाणून घ्या पडद्यामागची ५ मोठी कारणं!

१९९३ च्या मुंबई दंगलींनंतर बाळासाहेब ठाकरेंवर १४० खटले भरले गेले. तेव्हा कायद्याच्या भाषेत ‘सामना’चे संपादक म्हणून बाळासाहेब ‘आरोपी क्रमांक १’ आणि संजय राऊत ‘आरोपी क्रमांक २’ होते. पण आज, २०२६ मध्ये परिस्थिती बदलली आहे. ठाकरेंच्या शिवसेनेला लागलेल्या ओहोटीसाठी आता स्वतः पक्षाचेच नेते संजय राऊतांना ‘मुख्य आरोपी’च्या पिंजऱ्यात उभं करत आहेत

१. संघटनेपेक्षा कॅमेऱ्याला महत्त्व? संजय राऊत रोज सकाळी १० वाजता टीव्हीवर येतात, विरोधकांवर तुटून पडतात. पण पक्षात चर्चा अशी आहे की, त्यांनी शिवसैनिकांची लढाई फक्त ‘माध्यमांच्या कॅमेऱ्यात’ बंदिस्त केली . २०२२ च्या फुटीनंतर पक्ष पुन्हा बांधण्यासाठी जमिनीवर उतरून कार्यकर्त्यांना बळ देणं गरजेचं होतं. मात्र, राऊतांचे दौरे मुंबईबाहेर फारसे दिसले नाहीत, ज्यामुळे पक्ष संघटना कमकुवत झाल्याची टीका होत आहे.

२. संवादाऐवजी संघर्षाची भाषा राजकारणात परतीचे दोर कधीच कापायचे नसतात. पण राऊतांनी बंडखोर खासदारांना थेट शिवीगाळ करणं किंवा ‘ऑपरेशन तुडवा’सारखी भाषा वापरल्यामुळे, ज्यांना परत यायची इच्छा होती त्यांच्यासाठीही दरवाजे बंद झाले. ओमराजे निंबाळकरांसारख्या नेत्यांची मनधरणी करण्याऐवजी त्यांना ‘गद्दार’ संबोधल्याने पक्षांतर्गत रोष वाढला.

विधानसभा अध्यक्षांची ‘मराठी’ की ‘माती’?

३. ‘सब कुछ राऊत’ आणि नवीन नेतृत्वाचा बळी ठाकरे गटात सध्या ‘एक्स्ट्रा पॉवर सेंटर’ तयार झालंय. पक्षात नवीन चेहरे तयार होऊ दिले जात नसल्याचा आरोप होतोय. सांगलीत चंद्रहार पाटील यांना उमेदवारी देण्यासाठी राऊत आग्रही होते, पण पराभवानंतर त्यांना वारऱ्यावर सोडलं गेलं, परिणामी त्यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. अगदी आदित्य ठाकरेंसोबतही राऊतांचे अंतर्गत संघर्ष असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत.

४. हिंदुत्वाशी तडजोड आणि महाविकास आघाडी २०१९ मध्ये राऊतांनी शरद पवारांशी जवळीक साधून महाविकास आघाडीचा प्रयोग केला. यामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले खरे, पण शिवसेनेचा मूळ हिंदुत्ववादी मतदार दुखावला गेला. सत्तेच्या हव्यासापोटी विचारधारेची केलेली प्रतारणाच पहिल्या आणि दुसऱ्या बंडाला कारणीभूत ठरली, असं मानलं जातं.

५. स्ट्राइक रेट आणि कामगिरीत घसरण लोकसभा निवडणुकीत जास्त जागा लढवूनही ठाकरेंच्या शिवसेनेचा स्ट्राइक रेट कमी राहिला, तर एकनाथ शिंदेंनी १५ पैकी ७ जागा जिंकून आपला परफॉर्मन्स सिद्ध केला . मुंबई महापालिकेसारखी महत्त्वाची सत्ताही ठाकरेंच्या हातातून निसटली आहे.

शिंदे-ठाकरे आमनेसामने: फेकनाथ मिंदे टीकेला प्रत्युत्तर

थोडक्यात, संजय राऊतांनी माध्यमांमध्ये पक्षाची प्रतिमा जपण्याचा प्रयत्न केला असला, तरी पक्षाची मूळ मुळं भक्कम करण्यात ते अपयशी ठरल्याचं चित्र दिसत आहे. तुम्हाला काय वाटतं? शिवसेनेच्या या स्थितीला खरोखर संजय राऊतच जबाबदार आहेत का? कमेंट्समध्ये नक्की सांगा!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top