
विधानसभा अध्यक्षांची ‘मराठी’ की ‘माती’? राहुल नार्वेकरांच्या ‘त्या’ वाचनाने महाराष्ट्र संतापला!
पावसाळी अधिवेशनाचा पहिला दिवस हा सहसा शोक प्रस्तावाचा आणि श्रद्धांजली वाहण्याचा असतो. मात्र, यंदाच्या अधिवेशनाचा पहिलाच दिवस एका वेगळ्याच वादाने गाजला. निमित्त ठरले ते विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिग्गज गायिका आशा भोसले यांना वाहिलेली श्रद्धांजली. ही श्रद्धांजली वाचताना अध्यक्षांच्या मराठी भाषेची जी अवस्था झाली, ती पाहून संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे.
नेमकं काय घडलं? शोक प्रस्ताव वाचताना नार्वेकरांनी केवळ शब्दांचीच नव्हे, तर तथ्यांचीही मोठी गल्लत केली. आशाताईंचे वडील पंडित दीनानाथ मंगेशकर यांचे नाव त्यांनी चक्क ‘पंडित दीनदयाल मंगेशकर’ असे वाचले. इतकेच नाही, तर ‘मराठी ललाटीचे वैभव’ या शब्दांचा उच्चार करताना त्यांची चांगलीच फजिती झाली. कोणत्याही भाषेत स्वल्पविराम आणि पूर्णविराम यांना महत्त्व असते, पण नार्वेकरांच्या वाचनात या गोष्टींचा अभाव असल्याने अनेक वाक्यांचा नेमका अर्थ काय, हे समजणे कठीण झाले होते.
धाराशिवमध्ये निंबाळकर बंधूंमध्ये राजकीय ठिणगी!
राज ठाकरेंचा ‘खळबळजनक’ टोला या प्रकरणावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अत्यंत कडक शब्दांत आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत विचारले की, “वाचण्यापूर्वी त्या कागदातून भेळ खाल्ली होती का?” अध्यक्षांना साधे कागदावर लिहून दिलेले मराठी वाचता येत नाही, याबद्दल त्यांनी तीव्र उद्वेग व्यक्त केला. तसेच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही निशाणा साधत त्यांनी या गंभीर प्रकाराकडे कोणाचेच लक्ष कसे गेले नाही, असा सवाल उपस्थित केला.

‘साऊथ बॉम्बे’ स्टाईल मराठीवर टीका सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी यांनीही नार्वेकरांच्या भाषेचा समाचार घेतला. “उच्चारांच्या चुका आणि भाषेतील अडखळणं हे मराठी नसून ‘साऊथ बॉम्बे स्टाईल’ मराठी आहे,” अशी टीका त्यांनी केली. “मी ३४ वर्षे गुजराती कुटुंबात राहूनही माझे मराठी अध्यक्षांपेक्षा नक्कीच चांगले आहे,” असा टोलाही त्यांनी लगावला.
शिंदे-ठाकरे आमनेसामने: फेकनाथ मिंदे टीकेला प्रत्युत्तर

मराठी भाषेची ‘ऐशी की तैशी’ शिवसेनेने (ठाकरे गट) देखील यावर तीव्र आक्षेप नोंदवला. अध्यक्षांनी ती नोट आधी वाचलीच नव्हती का, असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी मराठी भाषेची ‘ऐशी की तैशी’ झाल्याची भावना व्यक्त केली.
एकूणच, मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला असताना, राज्याच्या सर्वोच्च सभागृहाच्या अध्यक्षांनीच मराठीचे वाभाडे काढल्याने सर्वसामान्यांमध्ये नाराजी आहे. कवी सुरेश भटांच्या ओळींची आज पुन्हा आठवण येते – “आपल्याच घरात हाल सोसते मराठी.”
बीडमध्ये विलास घुले हत्या प्रकरणावरून राजकीय रणकंदन

Mahesh Rathod is a News Writer at Maharashtra Trending with over five years of experience covering Maharashtra politics, breaking news, social issues, crime, and current affairs. He is committed to delivering accurate, timely, and reliable news that keeps readers informed about the latest developments across the state.








