संजय दिना पाटील: वादांचा ‘धडाका’ आणि राड्यांचा इतिहास

संजय दिना पाटील: वादांचा ‘धडाका’ आणि राड्यांचा इतिहास! पत्रकारांना धमकी अन् राऊतांशी पंगा; नेमकं प्रकरण काय?

मुंबईच्या राजकारणात सध्या एकाच नावाची जोरदार चर्चा आहे, ती म्हणजे शिंदे गटाचे खासदार संजय दिना पाटील. कधीकाळी शांत वाटणारे हे नेते सध्या इतके का भडकले आहेत की त्यांनी थेट लोकशाहीचा चौथा स्तंभ मानल्या जाणाऱ्या पत्रकारांनाच शिवीगाळ आणि मारण्याची धमकी दिली?

गळाला लागली चक्क मगर मासा राहिला बाजूला

काय आहे ताजं प्रकरण? नुकताच संजय दिना पाटील यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला. आपल्या निवासस्थानी बाईट घेण्यासाठी आलेल्या पत्रकारांवर ते प्रचंड संतापले. “मी खासदार आहे हे विसरून जाईन, तुम्हाला मारून पाठवीन, पोलिसांना जाऊन सांगा,” अशा शब्दांत त्यांनी पत्रकारांना दम दिला. इतकंच नाही, तर “आम्ही पाच माणसं मारून टाकलीत, नादाला लागलात तर हॉस्पिटल किंवा स्मशान दाखवू,” असं खळबळजनक विधानही त्यांनी केलं होतं.

संजय राऊतांशी थेट ‘सामना’ या वादाची ठिणगी पडली ती संजय राऊत यांच्याशी सुरू असलेल्या वाकयुद्धामुळे. ठाकरेंचे खासदार फुटल्यानंतर राऊतांनी आक्रमक भूमिका घेतली, ज्यावर पाटील यांनी “घरात घुसून मारू, सुरक्षारक्षक असतील तर बॉम्ब टाकू” असं प्रतिआव्हान दिलं. यानंतर संजय राऊतांनी थेट पोलीस आयुक्तांना पत्र लिहून पाटील यांनी ‘पाच खून’ कुणाचे केले आणि त्यांच्याकडे ‘बॉम्ब’ कुठून आले, याची ‘यूएपीए’ (UAPA) अंतर्गत चौकशी करण्याची मागणी केली आहे.

रागाचं नेमकं कारण काय? संजय दिना पाटील इतके का घसरले, यामागे काही प्रमुख कारणं सांगितली जात आहेत:

१. गद्दारीचा शिक्का: ठाकरे गटातून शिंदे गटात जाताना झालेली ‘मीडिया ट्रायल’ आणि गद्दारीचा लागलेला शिक्का त्यांना अस्वस्थ करत असल्याची चर्चा आहे.

नसरापूर प्रकरणात आरोपी दोषी फाशीची शिक्षा होणार ?

२. कौटुंबिक पेच: पाटील यांनी पक्षांतर केलं असलं तरी त्यांची कन्या राजुल पाटील आजही ठाकरेंसोबतच आहेत. जेव्हा पत्रकारांनी त्यांना मुलीबद्दल प्रश्न विचारला, तेव्हा त्यांचा संयम सुटला आणि त्यांनी अश्लील भाषेत पत्रकारांना लक्ष्य केलं.

३. राड्यांचा इतिहास: पाटील यांचा इतिहास ‘मसल पॉवर’ आणि राड्यांशी जोडलेला आहे. २०१६ मध्ये नवाब मलिकांसोबत झालेला गोळीबाराचा वाद असो किंवा २०२४ मध्ये मिहीर कोटेचा यांच्या ऑफिसवरील हल्ला, वादांनी त्यांची साथ कधीच सोडलेली नाही.

राजकीय पडसाद या प्रकरणानंतर आदित्य ठाकरेंनी त्यांना राजीनामा देऊन पुन्हा निवडून येण्याचं आव्हान दिलं आहे. दुसरीकडे, एकनाथ शिंदे यांनी “अनावधानाने काही बोलले असतील तर माफी मागू” असं म्हणत वेळ मारून नेली असली, तरी पाटील यांच्या या ‘रांगड्या’ अवतारामुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.

FIFA चा मोठा निर्णय! कोल्हापुरी फुटबॉल फॅन्सचा जागतिक डंका

आता प्रश्न हाच उरतो की, हे राडे आणि धमक्यांच्या सत्रामध्ये जनतेच्या विकासकामांचं काय? तुम्हाला काय वाटतं, खासदारांची ही भाषा योग्य आहे का? कमेंट्समध्ये नक्की सांगा!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top