सावधान! तुम्ही पिताय ते दूध बनावट तर नाही ना? तुकाराम मुंडेंनी उघड केलं धक्कादायक रॅकेट

अन्न आणि औषध प्रशासन (FDA) आयुक्त तुकाराम मुंडे यांनी पदभार स्वीकारल्यापासून राज्यात धडाकेबाज कारवायांचे सत्र सुरू केले आहे. ४ जुलै रोजी पुणे जिल्ह्यातील मंचर येथे करण्यात आलेली कारवाई सर्वांना हादरवणारी ठरली असून यात बनावट दूध बनवणाऱ्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. या रॅकेटचे जाळे थेट सात जिल्ह्यांपर्यंत पसरले असून मास्टरमाइंडने हजारो लिटर नकली दूध बाजारात खपवल्याचे समोर आले आहे.

बनावट दूध कसे तयार व्हायचे?

 या रॅकेटमध्ये पाणी, स्कीम मिल्क पावडर (SMP), व्हे पावडर, डिटर्जंट पावडर, पाम ऑईल आणि इमल्सिफायर यांसारख्या घातक पदार्थांचा वापर केला जात असे. दुधाला नैसर्गिक फेस येण्यासाठी शॅम्पू आणि फॅट वाढवण्यासाठी पाम ऑईलचा वापर केला जात होता. लॅक्टोमीटर चाचणीत दूध शुद्ध दिसावे आणि प्रोटीनचे प्रमाण योग्य वाटावे म्हणून त्यात युरिया, ग्लुकोज आणि मीठ मिसळले जायचे.

बुरशी लागलेल्या अन्नाबाबत विज्ञानाचे काय आहे म्हणणे? जाणून घ्या ‘सेव्ह’ आणि ‘थ्रो’चे नियम

७ जिल्ह्यांमध्ये पसरले होते रॅकेटचे जाळे

 पुणे, सोलापूर, अहिल्यानगर, जालना, ठाणे, जळगाव आणि धाराशीव या सात जिल्ह्यांमध्ये हे बनावट दुधाचे रॅकेट सक्रिय होते. मुख्य आरोपी सुशांत हिंगे याने स्वतः हे बनावट दूध बनवण्याचे तंत्र शिकून घेतले होते. त्यानंतर त्याने इतर दूध उत्पादक शेतकरी आणि डेअरी मालकांनाही हे दूध कसे बनवायचे आणि नफा कसा मिळवायचा याचे प्रशिक्षण दिले होते.

४००० लिटर दुधाचे गणित आणि विक्री

 स्थानिक पत्रकार आणि गावकऱ्यांच्या दाव्यानुसार, काही संकलन केंद्रांवर ६०० लिटर दूध येत असे, मात्र बनावट दूध मिसळून बाहेर पडताना ते ४००० लिटर व्हायचे. सुशांत हिंगे हे बनावट दूध थेट पिशव्यांमध्ये पॅक करून किंवा नामांकित कंपन्यांच्या माध्यमातून पुणे आणि इतर शहरांत विकत असे. मुंडेंनी दिलेल्या माहितीनुसार, काही वेळा ५०० लिटर बनावट दूध १००० लिटर शुद्ध दुधात मिसळून डेअरीला दिले जात होते.

पुणे: मंचरमध्ये दूध भेसळ करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; तुकाराम मुंढेंची मोठी कारवाई

एफडीएची धडक कारवाई आणि अटक

 मंचरमधील नवसारी खुर्द येथील ‘नवकार डिस्ट्रीब्युटर्स’ या गोदामावर एफडीए आणि पोलिसांनी संयुक्त छापा टाकला. या कारवाईत सुमारे २.५ लाख रुपयांचा मुद्देमाल आणि १३८५ किलो बनावट साहित्य जप्त करण्यात आले आहे.आतापर्यंत या प्रकरणात १३ आरोपींना अटक करण्यात आली असून मास्टरमाइंड सुशांत हिंगेसह एकूण २६ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

तुकाराम मुंडेंच्या या दणक्यामुळे दूध भेसळ करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. त्यांनी स्पष्ट केले आहे की, ही केवळ सुरुवात असून राज्यात अशी अजून दोन मोठी रॅकेट सक्रिय आहेत, ज्यांच्यावर लवकरच कारवाई होईल. नागरिकांनी आता दूध खरेदी करताना अधिक सतर्क राहण्याची गरज निर्माण झाली आहे.

“कारखाना चोरण्याइतकं सोपं नाही…” पडळकरांनी रोहित पवारांसमोरच शरद पवारांना झापलं

  • मंचरमध्ये तुकाराम मुंडेंच्या नेतृत्वाखाली बनावट दुधाचे मोठे रॅकेट उद्ध्वस्त करण्यात आले.
  • डिटर्जंट, पाम ऑईल, शॅम्पू आणि युरिया वापरून १००% नकली दूध बनवले जात होते.
  • पुणे, सोलापूर, ठाणे यांसह राज्यातील ७ जिल्ह्यांत या रॅकेटचे जाळे पसरले होते.
  • ६०० लिटर शुद्ध दुधामध्ये बनावट दूध मिसळून ते ४००० लिटर करून विकले जात असल्याचा आरोप.
  • या प्रकरणात आतापर्यंत १३ जणांना अटक झाली असून एकूण २६ जणांची नावे समोर आली आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top